Headlinesगैजेट्सटेली टॉक

Airtel चे चार भन्नाट रिचार्ज प्लॅन, फ्री मिळेल Disney+ Hotstar VIP चं सबस्क्रिप्शन

Airtel चे चार भन्नाट रिचार्ज प्लॅन, फ्री मिळेल Disney+ Hotstar VIP चं सबस्क्रिप्शन

airtel hotstar : टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल आपल्या युजर्सना फ्रीमध्ये Disney+ Hotstar VIP चं मोफत सबस्क्रिप्शन मोफत देत आहे. तसं बघायला गेलं तर ग्राहकांना फक्त Disney+Hotstar VIP चं एका वर्षाचं सब्सक्रिप्शन घेण्यासाठी 399 रुपये मोजावे लागतात. पण, एअरटेलकडून आपल्या काही प्रीपेड प्लॅन्समध्ये हे मोफत दिलं जात आहे. सविस्तर जाणून घेऊया या प्लॅन्सबाबत –

599 रुपयांचा प्लॅन :-
एअरटेलच्या 599 रुपयांच्या या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डाटा आणि रोज 100 एसएमएस वापरण्यास मिळतील. तसेच, एअरटेल थँक्स आणि मोफत Disney+Hotstar VIP सब्सक्रिप्शन मिळेल. या प्लॅनची व्हॅलिडिटी 56 दिवसांची आहे.

448 रुपयांचा प्लॅन :-
एअरटेलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा वापरण्यास मिळेल. या प्लॅनमध्येही सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसोबत रोज 100 SMS वापरण्यास मिळतील. तसेच, एअरटेल थँक्स आणि मोफत Disney+Hotstar VIP सब्सक्रिप्शन मिळेल. पण या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे.

499 रुपयांचा प्लॅन :-
एअरटेलच्या 499 रुपयांच्या प्लॅनमध्येही 448 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच सर्व सेवा मिळतात. पण हा प्लॅन फक्त पहिल्यांदा रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठीच आहे.

2,698 रुपयांचा प्लॅन :-
एअरटेलकडे Disney+ Hotstar VIP सब्स्क्रिप्शन देणारा 2,698 रुपयांचा रिचार्ज प्लॅनही आहे. यामध्ये 365 दिवसांच्या वैधतेसह म्हणजेच एका वर्षासाठी दररोज 2जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगचा आणि रोज 100 एसएमएसची सर्व्हिस या प्लॅनमध्ये मिळते.

याशिवाय कंपनीने आपल्या 401 रुपयांच्या Disney+ Hotstar VIP प्लॅनमध्येही बदल केला आहे. 401 रुपयांच्या या प्लॅनमध्ये आता कंपनी आपल्या युजर्सना आधीपेक्षा 10 पट जास्त डेटा देत आहे. कंपनी या प्लॅनमध्ये आता 3GB डेटाऐवजी 30 जीबी डेटा देत आहे.  28 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये  मोफत व्हॉइस कॉलिंग किंवा एसएमएसची सेवा मात्र युजर्सना भेटत नाही.

ये भी पढ़ें – मोर्चरी में सुशांत के शव के पास क्या करती रहीं रिया? चश्मदीद ने कहा- CBI को सब बताने को तैयार

ये भी पढ़ें – बाइक पर विस्फोटक ले निकला था IS आतंकी, कहां करने वाला था धमाका? यूपी के बलरामपुर से आया था राजधानी

source by : https://www.loksatta.com/

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button